लातूर शहर विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व नियोजन समितीचे सदस्य यांच्या समवेत मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, लवकरच लसीचा पूरवठा सुरळीत होईल. त्यामुळे प्रत्येक घराशी संपर्क साधून लसीकरण मोहिम यशस्वी करावी. हिवरेबाजारच्या धर्तीवर प्रत्येक प्रभाग आणि गावांमधून जनजागृती राबवावी. खाजगी रूग्णालयांनी ऑक्सीजन प्लांट उभारावेत, व्हेन्टिलेटर वाढवावेत. महापालिकेने व्हेन्टिलेटर वापरासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तातडीने नियुक्ती करावी. महापालिका आणि ग्रामपंचायतीने पावसाळ्यापुर्वीची सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वताची काळजी घ्यावी अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केल्या. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, समद पटेल, विरोध पक्षनेते ॲड. दीपक सूळ, सभापती सरस्वती प्रताप पाटील, प्रकाश ऊफाडे, अशोक गोविंदपूरकर, सपना किसवे, कैलास कांबळे, रवीशंकर जाधव, बाळासाहेब देशमुख, सचिन बंडापल्ले, हारूबाई बोइनवाड, इम्रान सयद, योजना कामेगावकर, दिप्ती खंडागळे, सोजरबाई मदने, विजयकुमार साबदे, गौरोबी असीफ, रफतबी शेख, अहमदखां पठाण, गौरव काथवटे, युनुस मोमीन, फर्जाना बागवान, पुजा पंचाक्षरी, अयुब मणियार, तांबोळी रूबीना सुलेमान, सचिन मस्के, रेहाना बासले, कांचन अजनीकर, कांलीदा भगत, ओमप्रकाश पडीले, उर्मीला बरूरे, कमल सोमवंशी, हकीम शेख, सुभाष जाधव, शोभा पंडीत-ढमाले, परमेश्वर वाघमारे, सोनाली थोरमोटे, शितल फुटाणे, भिमाशंकर शेटे, रघुनाथ शिंदे, रामराजे चामे आदींची उपस्थिती होती.
खाजगी रूग्णालयांनी ऑक्सीजन प्लांट उभारावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:20 AM