शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सिंचन विहिरीसाठी मोबाईलवरून प्रस्ताव; लातूर जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

By हरी मोकाशे | Published: January 15, 2024 7:00 PM

लातूर जिल्ह्यात ११ हजार ७९० विहिरींचे उद्दिष्ट

लातूर : शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर देण्यात येत आहे. दरम्यान, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून शासनाने आता मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे घरबसल्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून मोबाईलवरून ॲपद्वारे प्रस्ताव सादर करता येत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान होते. शिवाय, जलस्रोत नसल्याने बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात; मात्र त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत नाही. सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर देण्यात येते. योजनेंतर्गत विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत होते. दोन वर्षांपासून त्यात वाढ करण्यात येऊन ४ लाखांचे अनुदान दिले जात आहे. योजनेंतर्गत सिंचन विहीर, शेततळे खोदण्याबरोबर फळबाग लागवडही करता येते.

घरबसल्या दाखल करता येईल अर्ज...मोबाईल प्ले स्टोअरमधून egshorti नावाचे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. या ॲपच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता येतात. प्रस्तावासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईनरित्या दाखल करावी. विशेषत: घरबसल्या अर्ज दाखल करता येतो. हा प्रस्ताव थेट गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचतो.

४ हजार विहिरींच्या खोदकामास सुरुवात...जिल्ह्यात ११ हजार ७९० सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ॲपद्वारे १ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत. ऑफलाईनरित्या पंचायत समितीकडे ८ हजार ४६९ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी ७ हजार ३३ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या ३ हजार ७३८ विहिरींच्या कामांना सुरुवात झाली आहे.

निलंगा तालुक्यास सर्वाधिक उद्दिष्ट...तालुका - उद्दिष्ट - ॲपद्वारे अर्जअहमदपूर - १४५५ - १०६औसा - १६३५ - १३९चाकूर - १०६५ - ११४देवणी - ६७५ - ५०जळकोट - ६४५ - १७९लातूर - १६६५ - ३८निलंगा - १७४० - १६७रेणापूर - ९७५ - ५६शिरुर अनं. - ६३० - २५उदगीर - १३०५ - १९९एकूण - ११७९० - १०७३

औसा तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू...सिंचन विहीर खोदकामाची सर्वाधिक कामे औसा तालुक्यात सुरू झाली असून ती ७२२ अशी आहेत. अहमदपुरात ३७९, चाकूर - ५४३, देवणी - ३४६, जळकोट - १४०, लातूर - ३९२, निलंगा- ३९२, रेणापूर- ३६१, शिरुर अनंतपाळ- १४६ आणि उदगीर तालुक्यात ३१७ कामे सुरू झाली आहेत. एकूण ३ हजार ७३८ विहिरींची कामे सुरू आहेत.

ॲपद्वारे अर्ज दाखल करावेत...ॲपच्या माध्यमातून सहजरित्या सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता येतो. त्यामुळे नागरिकांनी ॲपचा वापर करावा. तसेच ॲपमुळे लवकरात लवकर प्रस्तावास मंजुरी मिळण्यास मदत होईल. शिवाय, पारदर्शकता आणखीन वाढणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र