श्रावणमास तपोनुष्ठान आणि राष्ट्रसंत डॉ. शिवाचार्य महाराज यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बसव साहित्याचे अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी संपादित केलेल्या आणि शरण साहित्य अध्यासनने निर्मिती केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वसमतचे दिगंबर शिवाचार्य, विरुपाक्ष शिवाचार्य मुखेड, काशिनाथ शिवाचार्य पाथरी, महादेव शिवाचार्य कळमनुरी, पुस्तकाचे संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ, संतोष पवार, माधव बरगे, डॉ. अजित गोपछडे आदींच्या हस्ते झाले.
या पुस्तकात शरण साहित्याचे ज्येष्ठ संशोधक प्रा.डॉ. राजशेखर सोलापुरे, राजू जुबरे भालकी, प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे देगलूर, प्रा.डॉ. सचितानंद बिचेवार अमरावती, प्रा.डॉ. म.ई. तंगावार उदगीर, रजनीताई मंगलगे, लताताई मुद्दे, ॲड. शिवानंद हैबतपुरे, सुधीरअप्पा सराफ हिंगोली, प्रा. उमाकांत होनराव लातूर आणि उध्दव महाराज हैबतपुरे यांनी शिवाचार्य महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रामदास पाटील यांनी शिवाचार्य महाराजांच्या संकल्पनेतील भक्तिस्थळाबाबत केलेले विवेचन केले आहे. यावेळी बसव कथाकार ॲड. शिवानंद हैबतपुरे यांनी पुस्तकाची संकल्पना मांडली. यावेळी विश्वस्त समितीचे रामदास पाटील, लता मुद्दे, गजानन होनराव आदी उपस्थित होतेे.
कॅप्शन : अहमदपूर येथील भक्तिस्थळावर ‘राष्ट्रसंत : चालतं देऊळ बोलता देव’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी दिगंबर शिवाचार्य, विरुपाक्ष शिवाचार्य, काशिनाथ शिवाचार्य, महादेव शिवाचार्य, चन्नवीर भद्रेश्वरमठ, संतोष पवार, माधव बरगे, डॉ. अजित गोपछडे.