राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील गावभागात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिसांनी साेमवारी छापा टाकला. यावेळी सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, राेकड, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक ते रत्नापूर चौक जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने तातडीने जुगारावर छापा टाकून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६३ हजार ५४० रुपये राेख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, साहेबराव हाके, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, नितीन कटारे, मनोज खोसे, चालक प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.