पाेलिसांनी सांगितले, लातूर-नांदेड महामार्गावर राळगा पाटी येथे दाेघे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे मागत असल्याची माहिती अहमदपूर येथील पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पाेलीस निरीक्षक आर.एच. केदार यांनी पाेलीस कर्मचाऱ्यांसह राळगापाटी येथे शनिवार, ४ सप्टेंबर राेजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला. दरम्यान, दाेघांना ताब्यात घेत अधिक चाैकशी केली असता, वर्गणीच्या नावाखाली वाहनधारकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असल्याचे आढळून आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात पाेलीस अंमलदार लक्ष्मण आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ बापूराव देवकत्ते (३० रा. राळगापाटी, ता. अहमदपूर) आणि अन्य एक अल्पवयीन मुलाविराेधात गुरनं. ३९३ / २०२१ कलम ३४१, ३८४, ३४ भादंविप्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नागनाथ देवकत्ते याला अहमदपूर येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाला नाेटीस देऊन साेडून देण्यात आले आहे. अधिक तपास पाेलीस अंमलदार केंद्रे करीत आहेत.
वर्गणीच्या नावाखाली खंडणी; अहमदपूर येथे दाेघाविराेधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:24 AM