निलंगा : जालना जिल्ह्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर व कवठापाटी रस्त्यावरील चौकामध्ये बुधवारी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर-जहिराबाद महामार्गावर मराठा बांधवांनी हाती भगवे झेंडे घेत रस्त्यावर बसून आंदोलन केले. आरक्षण दिल्याशिवाय गावातील नागरिक २०२४ च्या निवडणुकीत मतदान करणार नाही, असा निर्धार करण्यात आला. तसेच जरांगे पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्यावर लादलेले खोटे गुन्हे शासनाने माघारी घ्यावेत, त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्यास श्रद्धांजली वाहून निषेधही नोंदविण्यात आला.
निलंगाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, जमादार सुनील पाटील, राम गोमारे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सुरेंद्र धुमाळ, बबन चव्हाण, अरविंद सावंत, तुळशीदास साळुंके, गणेश जाधव, राहुल पवार, नारायण घारोळे, अमर फावडे, निखिल मोरे, दिगंबर सावंत, विठ्ठल देशमुख, तुळशीदास साळुंके, बाळासाहेब पाटील, समीर ढाकणे, माधव तोरणे, महेश तावडे, नारायण घारोळे, दिगंबर सावंत, विकास जांभळे, बापूराव जाधव, सुशांत सावंत, गोपाळ देशमुख, सागर साठे, बालाजी देशमुख, धनराज मोरे ,प्रशांत बोरुळे, बाळू पवार, किशोर भडके, शिवाजी देशमुख, आदींसह गौर, कवठा पाटी, विकास नगर, मसलगा, मुगाव येथील सकल मराठा बांधवांची उपस्थिती होती.