यावेळी राज्यसचिव चिकटे म्हणाले, जळकोट तालुका रिपब्लिकन पक्षवाढीसाठी सतत काम करतो. इतर तालुक्यांच्या तुलनेत क्रमांक १ ला जळकोट तालुक्याचे काम आहे. रिपब्लिकन पक्षाचे १४ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. तालुक्यातील अनेक माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या नेतृत्वात चांगले काम केले आहे. यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, अण्णाराव कांबळे अनिल काळे, अमोल गायकवाड, विलास राठोड यांना नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. माजी सरपंच कोंडिबा सवारे यांची लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी, गायकवाड यांचे लातूर जिल्हा सहसचिवपदी, संजय गायकवाड कला सांस्कृतिक विभाग जळकोट तालुका अध्यक्षपदी, जगळपूरचे माजी सरपंच बजरंग वाघमारे यांची वांजरवाडा सर्कल अध्यक्षपदी, विलास भारत राठोड यांची रिपब्लिकन पक्षाच्या युवा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर मरसांगवीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे यांची तालुका सल्लागारपदी, प्रदीप रामदास कांबळे यांची युवा तालुका उपाध्यक्षपदी, अजित ज्ञानोबा विराळे यांचे युवा तालुका सचिवपदी, देवीदास आडे घाेणसी सर्कल उपाध्यक्षपदी, राहुल जयपाल राठोड यांची रिपाइं बंजारा संघटना तालुका उपाध्यक्षपदी, आबास शेख यांची अल्पसंख्याक आघाडी तालुका उपाध्यक्षपदी, राहुल माधव गायकवाड यांची घोणसी सर्कल सचिवपदी, संगीता प्रकाश सूर्यवंशी यांचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी, प्रवीण गौतम सवारे,राजकुमार सवारे, तिरुपती सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जळकाेट येथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:21 AM