शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार!

By हरी मोकाशे | Published: August 02, 2024 6:48 PM

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : जिल्हा परिषदेत सर्वाधिक ४४१ पदे

लातूर : शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती होणार आहे. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या शोधात फिरत आहेत. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने व्यवसाय, नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने रोजगार अर्थात विद्यावेतन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती करण्यात येणार आहे.

असे मिळणार विद्यावेतन (रु.)...बारावी - ६ हजारआयटीआय - ८ हजारपदवी - १० हजार रुपये

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा...विभाग - जागासामान्य प्रशासन - ५५वित्त विभाग - ०१पंचायत - ३१आरोग्य - ४४कृषी - ०१बांधकाम - ११पशुसंवर्धन - ०८महिला व बालकल्याण - ०४शिक्षण - २८१जिल्हा बँक - ११०एसटी महामंडळ - १००

प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटर...योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटरची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असल्याने तेवढ्या सुशिक्षितांची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी अशा आहेत अटी...उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असावी. महाराष्ट्रातील रहिवासी, आधार कार्ड असावे. बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

ऑनलाईन करा अर्ज...जिल्ह्यात एकूण ३१ अस्थापनांमध्ये १ हजार ११५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यात जिल्हा परिषद, बँका, कारखाने अशा शासकीय, निमशासकीय, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षणानुसार निवड करण्यात येणार आहे.

१८० जणांनी केली ऑनलाईन नोंदणी...जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत १८० इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार निवड होणार आहे.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी...मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित युवकांना कामाचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर रोजगार क्षमता वाढणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षितांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.

अनुभवामुळे नोकरी, व्यवसाय मदत...योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच अनुभव येईल. नोकरी, व्यवसायासाठी मदत होईल. युवकांनी नोंदणी करावी.- बालाजी मरे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास.

 

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद