शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: July 22, 2024 17:27 IST

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरात मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने ३१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता २१.८० दलघमी असून, सोमवारपर्यंत प्रकल्पामध्ये ३१.१५ टक्के जलसाठा झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास रेणापूर तालुक्यातील सिंचनासह पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील अर्ध्या गावांची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवतो. या प्रकल्पावर शेतकरी व नागरिक अवलंबून आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प हा सर्वांच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचा आहे.

रेणा मध्यम प्रकल्पात ७ जुनपर्यंत फक्त १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच दरवर्षी परतीच्या पावसामध्ये मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून रेणा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. मात्र, गतवर्षी पावसाळा आणि परतीचा पाऊस न झाल्याने प्रकल्पातील साठा जेमतेम राहिला होता. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला होता. त्याचबरोबर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणीपुरवठा योजनेसाठी उपसा केल्याने या मध्यम प्रकल्पात केवळ १.५ टक्के जलसाठा होता. तालुक्यात प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पाऊसाने प्रकल्पात पाण्याची २१ टक्क्याने वाढला होता. त्यानंतर अधून-मधून पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यातही वाढ होत गेली. सद्यस्थिती ३१.१५ टक्के साठा असून, ९ ते १० महिने हा साठा पाणीपूरवठा योजनांसाठी चालू शकतो. मात्र, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

प्रकल्पात असा झाला जलसाठा...रेणा मध्यम प्रकल्पात १० जुनला २ टक्के वाढून पाण्याची टक्केवारी ३.४० टकके, ११ जुनला १६ टक्के, १२ जुन रोजी पाण्याची टक्केवारी २१ वर पोहचली होती. १० जुलैला २३.१५ व २१ जुलैला २४.४७ टक्के जलसाठा झाला होता. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा वेग वाढल्याने सोमवारी ३१.१५ टक्के एकूण प्रकल्पात जलसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभरात प्रकल्प क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारपर्यंत ३१ टक्के साठा असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ६.४०० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा ७.५३० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ३१.१५ टक्के आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील शेतीचे गणित अवलंबून असून, अनेक गावांना प्रकल्पाचा आधार आहे. जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस पडत असल्याने लवकरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी माेठ्या पावसाची गरज असून, अद्याप काही नद्यांचे पात्र कोरडेच आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र