लातूर : लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, कळब, धारूर या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. मांजरा प्रकल्पावरील महासांगवी मध्यम प्रकल्प १०० टक्के आणि त्याखाली असलेला संगमेश्वर मध्यम प्रकल्प ३० टक्के भरल्याने धनेगाव येथील मांजरा धरणात येवा सुरू झाला आहे.
या पावसाळ्यात आतापर्यंत ६.४४ दलघमी नवीन पाणी मांजरा धरणात आले आहे. यामुळे लातूरला दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर मांजरा प्रकल्प लवकरच भरेल. सद्य:स्थितीत धरणात मृतसाठा सोडून ०.१५२ दलघमी जिवंत साठा झाला आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाच्या वर पाटोदा तालुक्यात महासांगवी मध्यम प्रकल्प आहे. पाच दलघमी क्षमतेचा हा प्रकल्प असून तो १०० टक्के भरला आहे. तर त्याखाली भूम तालुक्यात संगमेश्वर मध्यम प्रकल्प असून त्याची क्षमता १६ दलघमी आहे. प्रकल्प ३० टक्के भरला आहे. कालपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. बुधवारी प्रकल्प क्षेत्रात ३० मिमी पाऊस झाला. त्यामुळे धनेगाव मांजरा प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५०४ मिमी पाऊस...मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५०४ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली असून मांजरा प्रकल्पात या पावसाळ्यात ६.४४ दलघमी नवीन पाणीसाठा झालेला आहे. गुरुवारी सकाळी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला असल्याची माहिती प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
मांजरा प्रकल्पाची स्थिती..पाणीपातळी : ६३५.७३ मी/ ६४२.३७ मी.एकूण पाणीसाठा दलघमी : ४७.२८२/२२४.०९३मृतसाठा दलघमी : ४७.१३०/ ४७.१३०जिवंत साठा दलघमी : ०.१५२/ १७६.९६३जिवंत पाणीसाठा टक्केवारी : ०.०९आवक दलघमी : ०.६०७/ ६.४४२आवक दर : ७.०३ क्युसेक/ २४८.२२ क्युसेक
थेंबे-थेंबे तळे साचेलमांजरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील उगलवाडी येथे असून पाटोदा तालुक्यातच महासांगवी आणि भूम तालुक्यात संगमेश्वर येथे या नदीवर दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील महासांगवी प्रकल्प भरला असून संगमेश्वर मध्यम प्रकल्पामध्ये चांगला येवा सुरू झालेला आहे. त्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरणात पाण्याची आवक संथ गतीने सुरू आहे. थेंबे-थेंबे तळे साचेल.