शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

जीर्ण जलकुंभ पाडा; रेणापूर तालुक्यातील हरवाडीकरांचे जलकुंभावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:29 PM

हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़ त्यामुळे हे जलकुंभ पाडण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात आली असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करीत गावक-यांनी मंगळवारी जलकुंभावर चढून आज आंदोलन केले़.

रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावास पाणीपुरवठ्यासाठी ५० वर्षांपूर्वी जलकुंभ बांधण्यात आला़ सध्या हा जलकुंभ जीर्ण अवस्थेत आहे़ काही दिवसांपूर्वी जलकुंभाचा काही भाग ढासळून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता़ जीर्ण अवस्थेमुळे या जलकुंभाचा वापर बंद करण्यात आला आहे़ दरम्यान, हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनास निवेदने दिली होती़ परंतु, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून त्याची दखल घेण्यात आली नाही़ दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात येऊन या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़ 

प्रशासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेले नागरिक मंगळवारी सकाळी १०़३० वा़ च्या सुमारास जलकुंभावर चढून उपोषण, आंदोलन सुरु केले आहे़ दरम्यान, दुपारी ३़३० वा़ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे सांगितल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले़

प्रशासनाच्या कारभारावर संतापगावातील जीर्ण जलकुंभ पाडावे, अशी वारंवार मागणी केली जात आहे़ परंतु, त्यास प्रशासनाकडून दाद देण्यात येत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि संताप व्यक्त केला़ या आंदोलनात उपसरपंच हणमंत कातपूरे, गोविंद ढोरमारे, अशोक गंगथडे, सतीश चोथवे, गणेश गंगथडे, सतीश माने, शिवाजी भंडे, दीपक चोथवे, नानासाहेब माने, मच्छिंद्र माने, दादाराव शिवणकर, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, जि़प़ सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले़

गावकरी पाच तास जलकुंभावऱ़मंगळवारी सकाळी १०़३० वा़पासून गावकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ ते दुपारी ३़३० वा़ मागे घेण्यात आले़ दरम्यान, या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी, भारतीय जनता पार्टी, संभाजी सेना, यशवंत सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, एस.आर.ग्रुप खरोळा आदींनी पाठिंबा दर्शविला़

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूरWaterपाणी