शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

लातूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या १३ अल्पवयीन मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 4:08 PM

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

लातूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या १३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची उकल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली असून, यात १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे.

जिल्हा पोलीस दलामध्ये नव्यानेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती घेतली. राज्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन तपास केला असता १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सहा तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आठ बालकामगारांचीही मुक्तता करण्यात कक्षाने यश मिळविले आहे.तरुण मुलींना पळवून आणून त्यांना अवैध धंद्यात गुंतविले जाते. मुलांचे अपहरण करून इतर भागांत पाठवून बेकायदेशीर कामाला लावले जाते. यावर आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाने आतापर्यंत १३ अल्पवयीन मुलींची व आठ बालकामगारांची सुटका केली आहे, अशी माहिती महिला पोलीस उपनिरीक्षक श्यामल देशमुख यांनी दिली.

या कक्षामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, महिला अंमलदार वंगे, लता गिरी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार हे कार्यरत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर