शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

देवणी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:21 AM

देवणी तालुक्यातील एकूण ४५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात २३ महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत. अनुसुचित जाती पुरुष ४, अनुसूचित ...

देवणी तालुक्यातील एकूण ४५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात २३ महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत. अनुसुचित जाती पुरुष ४, अनुसूचित जाती महिला ५, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती महिला १, नामाप्र पुरुष ६ तर नामाप्र महिला ६ तर सर्वसाधारण महिला ११, सर्वसाधारण पुरुष ११ पदाचे आरक्षण काढण्यात आले.

तालुक्यातील आरक्षणनिहाय सरपंच पदाची गावे पुढीलप्रमाणे, अनुसूचित जाती - देवणी (खु.), सावरगाव, माणकी, कोनाळी, तर अनुसूचित जाती महिलासाठी हंचनाळ, बटनपूर, टाकळी, गुरनाळ, विळेगाव ही गावे आरक्षित झाली आहेत.

अनुसूचित जमाती पुरुष आंबेगाव तर महिलांसाठी कमालवाडी ही गावे आरक्षित झाली आहेत. नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग पुरुषसाठी नागराळ, दवणहिप्परगा, दरेवाडी, लासोना, भोपनी, सय्यदपूर तर नामाप्रवर्ग महिलासाठी नागतीर्थवाडी, बोळेगाव, धनेगाव, वागदरी, नेकनाळ, कमरोद्दीनपूर ही गावे आरक्षित झाली आहेत.

सर्वसाधारण महिलासाठी डोंगरेवाडी, आनंदवाडी, अनंतवाडी, वलांडी, हेळंब, आचवला, चवणहिप्परगा, अंबानगर, वडमुरंबी, हिसामनगर, इंद्राळ या गावात महिलाचा कारभार राहणार आहे. तर सर्वसाधारण जागेसाठी संगम, अजनी, कवठाळा, सिंधिकामट, गुरधाळ, गौंडगाव, होनाळी, तळेगाव (भो.), बोरोळ, जवळगा, बोंबळी (खु.) या गावाचे सरपंचपद खुले राहिले आहे. सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीस उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार इसामोद्दीन शेख, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोनि सी.एस. कामटेवाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

आरक्षण सोडतप्रसंगी तहसील कार्यालयाचे कर्मचारी सुग्रीव बिरादार, प्रवीण कांबळे, दत्ता कासले, शिवराज चिदरे, तुळशीदास अनंतवाल, व्यंकट बिजापुरे यांनी परिश्रम घेतले.

बहुमताच्या आकड्यांचा खेळ रंगणार...

निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळीच्या आरक्षण सोडतीत बदल होईल असे मनसुबे अनेकांनी बांधले होते. मात्र, केवळ चार गावाच्या आरक्षणात बदल झाला आहे. उर्वरित ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण कायम राहिल्याने अनेकांचे मनसुबे उधळल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी २ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. तालुक्यातील काही गावात बहुमत एका गटाला तर सरपंचाचे उमेदवार दुसऱ्या गटाकडे असल्याने बहुमतवाल्या गटांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे. आंबेगाव येथील सरपंच पद एसटी वर्गासाठी जाहीर झाले असून, तेथे या वर्गासाठी सदस्य पदासाठी जागा न ठेवल्याने तेथील सरपंच पद हे तूर्त रिक्त राहणार आहे. डोंगरेवाडी येथील सात सदस्य ग्रामपंचायतीसाठी फक्त एक सदस्याची निवडणूक झाल्याने तेथेही ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यासाठी कायदेशीर अडचणी आल्या आहेत.