...
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
उदगीर : तालुक्यातील हेर ते करडखेल पाटी मार्गावरील हेर गावाजवळील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हा मार्ग उदगीर ते चाकूर व वलांडी ते हाळी जाणार मार्ग असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. पुलाचा भराव वाहून गेल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
...
उदयगिरीत माझी वसुंधरा कार्यक्रम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील रासेयो व नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबाेळी होते. यावेळी संदीप कानमंदे, विजय रकटे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. बालाजी होकर्णे यांनी केले. आभार डॉ. अशोक नागरगोजे यांनी मानले.
...
हरभरा पिकावरील कीड रोगाची पाहणी
शिरूर अनंतपाळ : ढगाळ वातावरणामुळे बहरात आलेल्या हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे तालुका कृषी सहायक व्ही.व्ही. सूर्यवंशी यांनी अजनी बु. येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, विठ्ठल धुमाळ यांच्या शेतावरही जाऊन पाहणी केली. यावेळी राजेश मुळजे, लक्ष्मण पाटील, कृषी मित्र विठ्ठल धुमाळ, प्रदीप सूर्यवंशी, अखिल शेख आदी उपस्थित होते.