तांदुळजा येथील रवी श्रीराम गायकवाड यांना २६ जून रोजी हे भांडे सापडले होते. ते भांड्याचे गाठोडे २८ रोजी सर्वासमक्ष परत केले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. माकेगाव (ता. अंबाजोगाई) येथील दत्तात्रय आबासाहेब देशमुख यांच्या मुलीचे लग्न काही दिवसावर आलेले होते. त्यामुळे त्यांनी मुरूड येथे बस्ता, भांडे खरेदी केले. टेम्पोत गावाकडे घेऊन जात असताना हे गाठोडे वाटेतच पडले. ज्या रवी गायकवाड याला हे गाठोडे सापडले त्याने सर्वांना ही माहिती दिली. दोन दिवसानंतर माकेगाव येथील दत्तात्रय देशमुख यांचे हे भांडे असल्याचे निष्पन्न झाले. रवी गायकवाड यांच्याबरोबर अरविंद कदम, शरद पवार, अरविंद कदम सारसेकर यांनी संबंधितांच्या शोध घेण्यात मोलाची भूमिका बजावली. याबद्दल मांजरा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बळीराम झारे, गणेश मोहिते, प्रकाश गायकवाड आशिष पवार , श्रीराम काळे हे उपस्थित होते. तरूणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल दत्तात्रय देशमुख, प्रकाश देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
कॅप्शन : वाटेत सापडलेले जवळपास ३५ ते ४० हजार रूपयांची संसारोपयोगी भांडी परत केल्यावर रवी गायकवाड, अरविंद कदम, शरद पवार, अरविंद कदम सारसेकर यांचा तांदुळजा येथे मांजरा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फाेटो : ०२ तांदुळजा डीएलफोटो