लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. सर्वाधिक पाऊस शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मंडळात असून ६० मी.मी. अशी नोंद आहे.
बुधवारी सकाळ पर्यंत जळकोट तालुक्यात सरासरी १३ मी.मी., चाकूर- १९ मी.मी., रेणापूर- १५.६ मी.मी., निलंगा- ११.६ मी.मी., लातूर- १४.६ मी.मी., उदगीर- ८. १४ मी.मी., औसा- २९.१४, अहमदपूर- ११.१६, शिरूर अनंतपाळ- ४८ मी.मी., तर देवणी तालुक्यात ०.३३ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
सर्वाधिक पाऊस शिरूर अनंतपाळ तालुक्यात झाला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मंडळात ६०, हिसमाबाद- 46, शिरूर अनंतपाळ- 38, तसेच मातोळा (ता. औसा)- ५७, निलंगा तालुक्यातील निटूर- ५२, पानचिंचोली- ४१, तर लातूर तालुक्यातील हरंगुळ मंडळात ३४ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. याशिवाय अन्य मंडळात यापेक्षा कमी पाऊस आहे. सर्वात कमी पाऊस देवणी तालुक्यात असून ०.३३ मी.मी. असा आहे.