शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात !

By संदीप शिंदे | Published: May 22, 2023 6:32 PM

मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.

उदगीर : येथील भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर असतानाच राज्याच्या पर्यटन सांस्कृतिक विभागाने या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी ४कोटी ८८ लाख ४४ हजार ५५८ रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा पुरातत्व विभागाने काढून ठेकेदारामार्फत हे काम गतीने सुरू आहे. येत्या कांही दिवसातच हा किल्ल्याचा कायापालट होणार असून, नवसंजीवनी मिळणार आहे.

पुणे येथील तेजस्विनी आफळे या वास्तूविशारदाकडून या किल्ल्याच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले होते. ढासळत चाललेला ऐतिहासिक किल्ला जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. युती शासनाच्या व तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले यांच्या कार्यकाळात या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी व डागडुजीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र कागदोपत्री कामे दाखवून करोडो रुपयांचा चुराडा या विभागाने केला होता. त्यामुळे या किल्ल्याची दुरवस्था कायम होती. भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर असतानाच तत्कालीन राज्यमंत्री व उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी या किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी ४ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता.

उदगीरचे नाव अजरामर...मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. १७६० मध्ये मराठे व निजाम यांच्यात लढाई होवून यात मराठ्यांचा विजय झाला होता. या विजयानंतर पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा संबंध या किल्ल्याशी आहे. त्यामुळे उदगीरच्या किल्ल्याची राज्यात नव्हे, तर भारताच्या इतिहासात गणना झालेली आहे. या किल्ल्यात जाज्वल्य देवस्थान व ज्यांच्या नावावरून या शहराचे नाव उदगीर हे नामकरण झाले .अशा उदागीरबाबांची संजीवन समाधी या किल्ल्यात आहे.

देशातले पहिले ध्वजारोहण...२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व १७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांच्या हस्ते सर्वात अगोदर पहाटे ५ वाजता या किल्ल्यावर ध्वजारोहण फडकण्याची परंपरा कायम सुरू आहे. माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर पुरातत्व विभागाकडून किल्ला दुरुस्तीची कामे सुरू आहेत. किल्ल्याच्या डागडुजी व दुरूस्तीमुळे या किल्ल्याला नवसंजीवनी मिळणार आहे.

टॅग्स :laturलातूरFortगडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण