शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बिहार राज्यातील दराेडेखाेरांचा महाराष्ट्र, कर्नाटकातील बॅंक, फायनान्सवर डाेळा !

By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2023 9:15 PM

रेकीनंतर सीमाभागात दराेडा टाकण्याचा रचला जाताे ‘प्लॅन’

लातूर : बिहारमधील दराेडेखाेरांच्या टाेळीचा म्हाेरक्या तुरुंगात असून, ताे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात माेठे दराेडे टाकण्याचा ‘प्लॅन’ रचताे. त्याची टाेळी हा प्लॅन यशस्वी करते. या प्लॅननुसार लातूरसह कर्नाटकातील आळंद भागात रेकी करण्यात आली. गणेशाेत्सवाच्या धामधुमीत असलेल्या पाेलिसांची नजर चुकवत माेठा दराेडा टाकायचा... असे नियाेजन झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी गुरुवारी त्यांचा हा ‘प्लॅन’ उधळून लावला आहे.

बिहारमधील कुख्यात दराेडेखाेरांच्या टाेळीचा महाराष्ट्र-कर्नाटकातील बॅंक, सराफा दुकान, फायनान्स कार्यालयावर डाेळा असल्याचे समाेर आले. टाेळीचा देशात विविध राज्यांच्या सीमाभागात वावर असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली, असे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे म्हणाले. दाेघांच्या अटकेनंतर चार पिस्टल, एक गावठी कट्टा, ५९ जिवंत काडतुसे, दुचाकी, बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, संपत फड, मनोज खोसे, प्रदीप चोपणे, रामहरी भोसले यांच्या पथकाने केली.

खबऱ्याने दिली टीप अन् पाेलिसांनी उधळला डाव...सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना खबऱ्याने टीप दिली. लातूर जिल्ह्यात पोलिस गणेश उत्सव, विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. याच काळात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत अट्टल गुन्हेगार आहेत. लातूर-मुरुड रोडवर दरोड्याच्या तयारीतील पाच जणांवर छापा मारला. पाचपैकी दोघांना पकडले. तिघे जागेवरच दोन बॅग टाकून पळाले. खबऱ्याच्या टीपनंतर पाेलिसांनी दराेडेखाेरांचा डाव उधळला.

लातुरात टाेळीतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल...टाेळीतील विकासकुमार पिता श्रीगोपाल शरण गुप्ता (२७, रा. तिउरी ठाणा, मानपूर, जि. नालंदा, बिहार), अमितकुमार रवींद्रसिंग यादव (२२ रा. फतवा, जि. पाटणा, बिहार) यांना अटक केली. तर शिवकुमार उर्फ संजीव कुमार यादव (३० रा. हाजीपुरा, जि. वैशाली, बिहार), लकीकुमार राजकुमार प्रधान (२८, रा. पश्चिम सारंगपूर), छोटू उर्फ ननकी यादव, (२९, रा. वैशाली, बिहार) हे फरार झाले. दिलीपकुमार (३५), सुबोधसिंग (४०, रा. चंडी, जि. नालंदा, बिहार) यांचा समावेश आहे. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाटणातील कारागृहातील सुबाेधसिंगशी टाेळीचा संपर्क...महाराष्ट्र- कर्नाटकात दराेडा टाकण्यासाठी आलेले टाेळीतील गुन्हेगार पाटणा कारागृहात असलेला गुन्हेगार सुबोधसिंग (रा. चंडी, जि. नालंदा, बिहार) याच्या संपर्कात आहेत. टाेळीने कर्नाटकातील आळंद, लातुरातील एखाद्या बँकेवर, सराफ दुकानावर, फायनान्सवर दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानुसार दरोडा टाकण्यासाठी बिहारमधून आल्याची कबुली दिली.

टॅग्स :Policeपोलिस