शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

अफवा पसरविणे हा गुन्हाच, साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट केल्यास ३ वर्षांचा कारावास

By राजकुमार जोंधळे | Published: April 25, 2023 6:40 PM

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.

लातूर : साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल करणे, लाइक करणे आणि ती फाॅरवर्ड करणे अंगलट येऊ शकते. असे करताना जनसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. आक्षेपार्ह, चुकीच्या पाेस्ट व्हायरल केल्या तर तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. त्यासाठी साेशल मीडिया वापरताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे म्हणाले.

साेशल मीडिया हा आजच्या जमान्यात नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे. साेशल मीडियाचा वापर सकारात्मक दृष्टीकाेन ठेवून केला पाहिजे. साेशल मीडियाचा वापर जितका चांगला ठरू शकताे, तितकाच ताे काेणाच्याही जिवावरही उठू शकताे. साेशल मीडियामुळे एखाद्याच्या भावना दुखावू शकतात. काेणाची माथी भडकू शकतात आणि त्यातून तेढ निर्माण हाेण्याचा धाेका असताे. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या काेणाच्या हक्क, अधिकारांवर गदा येत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा, असे आवाहन पाेलिस अधीक्षक मुंडे यांनी केले आहे.

आयटी ॲक्टनुसार कारवाईची तरतूद...साेशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्यास आयटी ॲक्टनुसार कलम ६७ नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे भावना दुखावणारी भाषा असलेले मजकूर, फाेटाे, व्हिडीओ साेशल मीडियावर पाेस्ट करू नका. धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करणारा, दुसऱ्याचा आत्मसन्मान दुखावणारा, देशाची एकता-सार्वभाैमत्व आदींचे नुकसान करणारा, काेणत्याही संप्रदायाच्या विराेधातला मजकूर साेशल मीडियावर व्हायरल करू नका.

अफवा पसरविणे हा ठरताे गुन्हाच...काेणाला जिवे मारण्याची धमकी देऊ नका, अश्लील कंटेंट, चाईल्ड पाेर्नाेग्राफी शेअर करू नका. अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. तसे केल्यास कारवाई केली जाते. यातील काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षाही आहे. भारतीय आयटी ॲक्टनुसार सायबर क्राइमसाठी तीन वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचीही शिक्षा न्यायालयाकडून ठाेठावली जाऊ शकते.

दाेषी ठरल्यास कारावासाची शिक्षा...नियमबाह्य मजकूर साेशल मीडियावर पाेस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार दाेषी ठरविले जाते. यामध्ये साेशल मीडिया युझर्स, साेशल मीडिया कंटेंट प्राेव्हायडर, नेटवर्क सर्व्हिस प्राेव्हायडर्स आदींचाही समावेश असताे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमlaturलातूर