निराधारांना शासनाच्या विविध योजनांची सुलभ अर्ज प्रक्रिया राबवून जलद लाभ देण्यासाठी लातूर ग्रामीण संगांयो समिती, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख व आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात तीन टप्पे राबविले जात आहेत. यात पहिल्या टप्प्यात निराधारांना घरपोच अर्जांचे वाटप करणे, दुसऱ्या टप्प्यात जनजागृती, सुसंवाद बैठकांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती घडवून आणणे, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहिती देणे, गावातील सर्व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे, समस्यांचे समाधान करण्यासाठी बैठका घेणे, त्यानंतर अर्ज दाखल करून घेण्यासाठी लाभार्थ्यांना सहकार्य करणे आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात समाधान शिबिराच्या माध्यमातून गावस्तरावरच अर्ज दाखल करून घेणे अशी प्रक्रिया आहे. साई येथे समाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे अर्ज दाखल करून घेण्यात आल्याचे संगांयोचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.
यावेळी संगांयोचे सदस्य परमेश्वर पवार, चेअरमन लिंबराज पवार, ‘मांजरा’चे संचालक ज्ञानेश्वर पवार, सरपंच सुमित्रा माने, उपसरपंच अमोल पवार, राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वलसे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर वलसे, नितीन पवार, परमेश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.