लातूर : बाजारात असलेल्या रकमेच्या ३० टक्के कमी रकमेवर चारचाकी फाेरच्यूनर गाडी देताे म्हणून लातुरातील एकाला २० लाखाला गंडविल्याची घटना लातुरात १२ ऑगस्ट २०२० ते ४ एप्रिल २०२३ या काळात घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात ठाणे येथील दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अनुप विजयकुमार कुलकर्णी (वय ३६ रा. दत्तकृपा हाउसिंग साेसायटी, एलआयसी काॅलनी, लातूर) यांना फाॅरच्यूनर चारचाकी गाडी बाजारातील सद्यस्थितीची किंमत ही चालू रकमेच्या ३० टक्के कमीने देण्याची हमी दर्शवून फाेरच्यूनर गाडीची किंमत २८ लाख ३० हजार रुपये ठरविण्यात आली. हा व्यवहार निजामाेद्दीन अब्दुलहुसेन सय्यद (वय ४०) आणि राेशन (वय २५ रा. दाेघेही रा. सिबली नगर, दाेस्ती अपार्टमेंट, ठाणे) यांच्यासाेबत ठरला हाेता. दरम्यान, यातील काही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून ९ लाख २५ हजार रुपये फिर्यादीच्या बँक खात्यावर परत आरटीजीएस केले. मात्र, उर्वरित रक्कम त्या दाेघा जणांनी परत केली नाही. त्याचबराेबर फाॅरच्यूनर गाडीही दिली नाही. गाडीसाठी दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली. शिवाय, अन्यायाने विश्वासघात केला. पैसे परत मागितले असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीने पाेलिसात दिलेल्या आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
वरिष्ठांकडे केलेल्या अर्जाची अधिक चाैकशी करण्यात आली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात निजामाेद्दीन अब्दुलहुसेन सय्यद (वय ४०) आणि राेशन (वय २५ रा. दाेघेही रा. सिबली नगर, दाेस्ती अपार्टमेंट, ठाणे) यांच्याविराेधात गुरनं. २२५ / २०२३ कलम ४२०, ४०६, ५०७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर करत आहेत.
पैशाची बचत; झाला विश्वासघात...
बाजारात असलेल्या चालू किमतीपेक्षा ३० टक्के कमी किमतीत फाॅरच्यूनर चारचाकी गाडी मिळत असल्याने फिर्यादीने ठाण्यातील दाेघांशी बाेलणी केली. ठरलेल्या व्यवहारानुसार वाहनाची किंमत २८ लाख ३० हजार रुपये ठरली हाेती. त्यातील काही रक्कम घेण्यात आली. शिवाय, वाहनही दिले नाही. याबाबत अधिक चाैकशी, विचारणा केली असता त्या दाेघांकडून उडावाउडवीची उत्तरे मिळाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेत दाद मागितली. केवळ ३० टक्के रकमेच्या बचतीपाेटी २० लाखांची फसवणूक हाेत विश्वासघात झाल्याचे समाेर आले आहे.