शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सात महिन्यांपासून शालेय पोषण आहाराची बिले रखडली; शिक्षकांना करावी लागतेय पदरमोड

By संदीप शिंदे | Published: September 23, 2022 7:41 PM

जिल्ह्यातील २ हजार १७९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या २ लाख ९१ हजार ८६६ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण केले जाते.

लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत पोषण आहाराचे वितरण केले जाते. आहारासाठी लागणारे इंधन, भाजीपाला आणि किराण्यासाठी दरमहा शाळांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून निधी न दिल्याने भाजीपाला, किराणा व इंधनासाठी शिक्षकांना पदरमोड करावी लागत आहे.

जिल्ह्यातील २ हजार १७९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या २ लाख ९१ हजार ८६६ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण केले जाते. शाळांच्या मागणीनुसार खासगी यंत्रणेमार्फत तांदुळाचा पुरवठा केला जात आहे. तर आहारासाठी लागणारे इंधन, भाजीपाला आणि किराणा साहित्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून शाळेच्या खात्यावर दरमहा निधी जमा करण्यात येतो. शाळांनी बिल जमा करताच तातडीने पैसे मिळतात. मात्र, मार्च महिन्यापासून पोषण आहाराची बिले सादर करूनही शाळांना निधी मिळालेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांना पदरमोड करून आहार शिजवावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून, तातडीने बिले अदा करण्याची मागणी होत आहे.

२१७९ शाळांमध्ये पोषण आहार...जिल्ह्यात २ हजार १७९ शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या २ लाख ९१ हजार ८६६ विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यामध्ये जि.प.च्या १२७८ शाळांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला जात असला तरी बिलेच मिळाली नसल्याने पोषण आहारातील खिचडी बेचव झाली आहे.

पदरमोड कधीपर्यंत करणार...गेल्या सात महिन्यांपासून बिले सबमिट करूनही खात्यावर निधी आलेला नाही. त्यामुळे पदरमोड कधीपर्यंत करणार असा प्रश्न आहे. पाठपुरावा करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक पदरमोड करतात. मात्र, आता सात महिने उलटूनही निधीच मिळाला नसल्याची ओरड आहे.

केंद्र शासनाकडून निधीच नाही...प्राथमिक शिक्षण संचालकांकडे बिले सादर केल्यावर शाळेच्या खात्यावर निधी जमा केला जातो. मात्र, केंद्र शासनाकडून संचालक कार्यालयाला निधीच मिळालेला नाही. परिणामी, बिले सादर करूनही शाळांना सात महिन्यांपासून पैसे मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळा