शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

अवैध दारूचा साठा जप्त; १८ जणांना पाेलिसी झटका !

By राजकुमार जोंधळे | Published: February 20, 2023 7:18 PM

पाेलिसांचे छापासत्र : तीन लाखांचा मुद्देमाल लागला हाती...

लातूर : जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात विशेष पाेलिस पथकांनी ठिकठिकाणी छापा मारला असून, गत आठ दिवसांपासून हे छापासत्र सुरूच आहे. यावेळी अवैध दारूविक्री करणाऱ्या १८ जणांना पाेलिस पथकांनी खाक्या दाखविला असून, सहा जणांना अटक केली. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात स्वतंत्र १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवारी काहीजण देशी-विदेशी दारूची चाेरट्या मार्गाने विक्री करत आहेत, अशी माहिती पाेलिस पथकाला मिळाली. याच्या आधारावर चाकूर, अहमदपूर तालुक्यात छापा मारला. यावेळी देशी दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक करताना आढळून आले. देशी दारूचा साठा करून ठेवणाऱ्या १२ जणांवर पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारूचा साठा असा २ लाख ८४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अहमदपूर आणि चाकूर येथील प्रत्येकी एका बारवर कारवाई केली आहे. अहमदपूर येथे दारूसह कोयता जप्त केला. याबाबत अहमदपूर, किनगाव, वाढवणा (बु.), चाकूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात सुरेश कचरु वाघमारे (२८, रा. शिरुर ताजबंद, ता. अहमदपूर), पांडुरंग बापूराव केंद्रे (६०, रा. अहमदपूर), संग्राम नामदेव कांबळे (३४, रा. अहमदपूर), माधव भगवान कांबळे (३२, रा. अहमदपूर), राम लिंबाजी पवार (४७, रा. अहमदपूर), शाहरुख मकसूद शेख (२३, रा. अहमदपूर), समद बाबू बागवान (४२, रा. किनगाव), माणिक सखाराम गुंडरे (५३, रा. वाढवणा, ता. उदगीर), संतोष पंढरी एकरूपे (३०, रा. कोदळी, ता. उदगीर), राममूर्ती बुरा (४०, रा. चाकूर), ज्ञानोबा पंडित पलमटे (३३, रा. पाथरवाडी, ता. रेणापूर), मंगेश अनिल नामदेव (३०, रा. शिरुर अनंतपाळ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा येथेही सहा जणांवर कारवाई...रविवारी अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार औसा हद्दीत ठिकठिकाणी छापा मारण्यात आला. देशी-विदेशी दारुसह ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा ठाण्यात महादू गौतम चाबुकस्वार (३०), अशोक शिवराम चाबुकस्वार (५९), ओम प्रकाश दत्तात्रेय मसलकर (३०, तिघे रा. नागरसोगा, ता. औसा), रावण तुकाराम गायकवाड (६५), दत्ता बब्रुवान मांजरे (२४), व्यंकट नारायण ढोले (६५, तिघे रा. बोरफळ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी