राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी, यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर सुशीलकुमार पांचाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून पांचाळ यांनी गावातील शिक्षक मित्र व विद्यार्थी मित्रांच्या मदतीने अभ्यास वर्गाच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवले. कोविड कॅप्टन हा नवोपक्रम ऑनलाईन सादर केला. घर-घर पाठशाळा, ओट्यावरची शाळा, अंगणातील शाळा, निसर्ग शाळा असे वेगवेगळे उपक्रम राबविले. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत जि.प.चे कृषी सभापती गोविंद चिलकुरे, डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, डॉ. भागिरथी गिरी, मुकुंद दहिफळे, सिद्धेश्वर कांबळे, संतोष ठाकूर, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, व्यंकट बोईनवाड, शिक्षण विस्तार अधिकारी जनार्धन चपडे, केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे, मुख्याध्यापक विरेंद्र उत्सुर्गे आदींनी केले.