लातूर : शहरातील गांधी चौकात पोस्टाचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयातील सर्व्हर हँग झाल्याने मंगळवारी कामकाज ठप्प झाले. परिणामी, बुधवारी दिवसभर पोस्ट कार्यालयातील सर्व कामे खोळंबलेलेच होते. ग्राहकांची गैरसोय झालीच. शिवाय, पोस्टाचीही ५० लाखांची उलाढाल ठप्प झाली. गांधी चौकातील मुख्य पोस्ट कार्यालयात २००३ मध्ये संगणकप्रणालीद्वारे कामकाजाला प्रारंभ झाला. सहा संगणक व एक सर्व्हर बसविण्यात आले. या प्रणालीमुळे कामकाजाला गती आली. परंतु, नंतरच्या कालावधीत कार्यालयाच्या गरजेनुसार संगणकांची संख्या वाढविण्यात आली़ परिणामी, वाढीव संगणकाचा ताण पडल्याने सर्व्हरची स्पीड कमी झाली. त्यामुळे संगणक हँग होऊ लागल्याने दररोज होणाऱ्या कार्यालयीन कामाला अडचण येऊ लागली़ ही सतत होणारी गैरसोय लक्षात घेवून नवीन सर्व्हरसाठी पाठपुरावा सुरू केला. परंतु, सर्व्हर उपलब्ध झाला नाही़ त्यातच मंगळवारी सायंकाळी अचानक मुख्य टपाल कार्यालयातील सर्व्हर बंद पडला. यामुळे बुधवारी दिवसभर सेव्हींग बँक, रिकरिंग डिपॉजिट, आऱडी़, पी़एल़आय, एम़आय़एस, भविष्यनिर्वाह निधी आदी कामे खोळंबली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कार्यालयातील ५५ कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून दिवसाकाठी होणारी पोस्टाची ५० लाखांची उलाढालही ठप्प झाली आहे़ (प्रतिनिधी)स्पीड पोस्ट, मनिआॅर्डर, पोस्टल इन्सुरन्स, रजिस्टर्ड पोस्ट, टेलिफोन बिल, पार्सल या सेवेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या बसस्थानक परिसरातील पोस्ट आॅफिसमध्ये सोय करण्यात आल्याची माहिती प्रधान डाकपाल एस़एच़ केदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़साडेतीन लाखांच्या सर्व्हरने ५० लाखांचा व्यवहार ठप्प...शहरातील गांधी चौकातील मुख्य पोस्ट कार्यालयातील सर्व्हर बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली़ नवीन सर्व्हरच्या खरेदीसाठी साडेतीन लाख रूपये लागतात़ यासाठी पाठपुरावा करूनही सर्व्हर उपलब्ध न झाल्याने मंगळवारी आहे ते सर्व्हर बंद झाल्याने बुधवारी ५० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़
सर्व्हर हँग; पोस्टाचा व्यवहार ठप्प !
By admin | Published: August 21, 2014 1:05 AM