राजकुमार जाेंधळे, लातूर : शिरूर ताजबंद येथील व्यापाऱ्याने लातुरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेतल्याची घटना बुधवारी समाेर आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. सुहास गोविंदराव मलफेदवार असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले की, शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथील कापड व्यापारी सुहास गोविंदराव मलफेदवार (वय २२) याचे नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये कापड दुकान आहे. ताे लातुरात १ जून रोजी दाेघा मित्रांबराेबर दुपारच्या सुमारास बार्शीरोडवरील एका हॉटेलात थांबला हाेता. यावेळी त्यांच्यासेाबत वाहनचालक, दुकानातील एक कर्मचारी हाेता. ते दाेघेही हॉटेलमध्ये खाली रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थांबले हाेते, तर सुहास हा एकटाच हॉटेलमधील खाेलीत आराम करण्यासाठी गेला हाेता. वडिलांनी सुहासला अनेकदा फाेन केला तरी प्रतिसाद मिळाला नाही. अखेर घरच्यांनी वाहनचालकाला फोन केला. त्यांनी सांगितले, सुहास हा वरच्या खाेलीत आराम करत आहे. नातेवाइकांनी शेवटी हॉटेल व्यवस्थापकाला चौकशी करण्यास सांगितले. फाेनला काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संशय बळावला. रात्री खाेलीचा दरवाजा मास्टर चावीने उघडला. यावेळी सुहास मलफेदवार याने गळफास घेतल्याचे आढळून आले असून, ही घटना बुधवारी समाेर आली.
आत्महत्या प्रकरण; पाेलिसांकडून तपास...
तरुण व्यापाऱ्याने हाॅटेलात आत्महत्या केल्याची घटना १ जून राेजी घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात नाेंद आहे. याचा पाेलिस तपास करत आहाेत. हाॅटेलमधील कर्मचारी, मित्रांचीही चाैकशी केली जात आहे. तपासातून आत्महत्येचे कारण समाेर येईल, असे एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे म्हणाले.