यशवंत विद्यालयात शिजयंतीनिमित्त व्याख्यान
लातूर - येथील यशवंत विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवरायांच्या इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही प्राचार्य डाॅ. महादेव गव्हाणे म्हणाले. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, शिवाजी जाधव, नरसिंग वाघमोडे, ज्ञानोबा नाईकवाडे, दिलीप कानगुले आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
वानवडा जि.प. शाळेत शिवजयंतीनिमित्त स्पर्धा
लातूर - औसा तालुक्यातील वानवडा जि.प. शाळेत शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे, संजय भोसले, मीरा कुलकर्णी, अनिता कुरुडकर, शोभा माने, रचना पुरी, ज्योती मादळे, मंदाकिनी उकादेवडे, संस्कार सोमवंशी, अक्षरा कदम, अनुष्का वीर, प्रणिती खापरे, ऐश्वर्या सोमवंशी, संध्या माने, अनुष्का मिरकले, प्रणिती मिरकले, सुजल सोमवंशी उपस्थित होते.