- गोविंद इंगळे
निलंगा (जि़ लातूर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने निलंग्यातील दापका रोड येथील अॅड़ एऩ डी़ नाईक यांच्या शेतात २ लाख ४० हजार चौरस फुटावर छत्रपती शिवरायांची हरित प्रतिमा साकारण्यात येत आहे़ त्याची दहा दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे़
शिवजयंतीनिमित्ताने अक्का फाऊंडेशन व हरित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने निलंग्यात विविध उपक्रम होणार आहेत़ यासंदर्भात पत्रकार परिषदेत अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, निलंग्यातील अॅड़ एऩडी़ नाईक यांच्या शेतात २ लाख ४० हजार चौरस फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांची हरित प्रतिमा साकारण्यात येत आहे़
अळीव गवताचे बीजारोपण करुन हे काम सुरु आहे़ एवढी मोठी प्रतिमा अबालवृध्दांना पाहता यावी, म्हणून ड्रोन कॅमेराद्वारे चार स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच या ठिकाणी शिवकालिन मैदानी खेळ, गडकिल्ल्यांची माहिती देणारे व सामाजिक एकोपा निर्माण करणारे चित्रप्रदर्शन, पोवाडा असे कार्यक्रम होणार आहेत़ याशिवाय, एक लाख वड व तुळशी बीजचे वाटप करून हा जागतिक विक्रम करण्याचा मानस आहे़
या प्रतिमेचे पूजन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समिती सभापती अजित माने, डॉ़ लालासाहेब देशमुख, प्रा़ दत्ता शाहीर, एम़एम़ जाधव, मुख्याध्यापक एस़एऩ शिरमाळे आदी उपस्थित होते.
मिरवणुकीवर तोफेतून पुष्पवृष्टीया मिरवणुकीवर तोफेतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिजाऊ चौकातून निघणारी ही मिरवणूक छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर पीरपाशा व दादापीर दर्ग्याचे सज्जाद अली यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहण होणार आहे़ तिथेच मुस्लिम बांधवांच्या वतीने शिरखुर्म्याचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यानंतर ही मिरवणूक छत्रपती संभाजी चौक ते आनंदमुनी चौकमार्गे दापका वेशीतून निळकंठेश्वर मंदिरात पोहोचल्यांनतर सांगता होणार आहे़
शिवकालीन जिवंत देखावा१९ फेब्रुवारी रोजी निलंग्यातील जिजाऊ चौकातून शिवजयंती मिरवणूक निघणार आहे़ त्यात एक हत्ती, २२ घोडे, २० भालदार, चोपदार, राहणार आहेत़ तसेच दोन हजार मुले- माँ जिजाऊ व बाल शिवरायांची वेशभूषा परिधान करुन सहभागी होणार आहेत़ त्याचबरोबर तीन हजार शालेय विद्यार्थी, तीन हजार महिला, झांज, लेझीम, ढोलताशा, हलकी पथक आहेत़ सोनेरी रथातून माँ जिजाऊ व बाल शिवरायांचा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे़
मुस्लिम बांधवही होणार सहभागी१९ व २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही़ या शिवजयंती महोत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लिम बांधवांसह सर्व जाती- धर्मांचे शिवभक्त सहभागी होणार आहेत़ मिरवणुकीत सहभागी नागरिकांना मुस्लिम बांधवांकडून मिरवणुकीचे स्वागत केले जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा सांगणारा हा हरित महोत्सव असून जागतिक विक्रम करण्याचा मानस असल्याचे अरविंद पाटील म्हणाले.