लातूर : इयत्ता दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचा मृतदेह चिंचाेली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आले. मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शुक्रवारी आढळला. तर मुलाचा मृतदेह शनिवारी पाेलिसांनी शाेधून काढला. ताे विहिरीतील गाळात अडकला हाेता. याबाबत गातेगाव आणि एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, वसवाडी परिसरात १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसाेबत राहत हाेती. दरम्यान, ती सध्या लातुरातील एका शाळेत दहावीत हाेती. तर मुलगा मूळचा केज तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली. मुलगी नेहमीप्रमाणे १५ फेब्रुवारी राेजी शाळेला म्हणून घराबाहेर पडली. दुपारी १ वाजता ती घराकडे परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शाेधाशाेध घेतली; मात्र आढळून आली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली हाेती. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चिंचाेली बल्लाळनाथ (ता. लातूर) येथील आत्माराम दगडू जाधव यांच्या शेतातील विहिरीत मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. शिवाय, विहिरीच्या काठावर मुलाची चप्पल असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी संशय व्यक्त करत विहिरीत मुलाच्या मृतदेहाचा शाेध सुरू केला. शुक्रवारी काही त्याचा शाेध लागला नाही. पुन्हा शनिवार सकाळपासूनच पुन्हा शाेध माेहीम सुरू केली. अखेर सायंकाळी ५ वाजता मुलाचाही मृतदेह पाेलिसांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. असे गातेगाव ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक किशाेर कांबळे म्हणाले.
एक दुजे के लिए...लातुरात सध्याला बार्शी मार्गावर वास्तव्याला असलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एकाचवेळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातील कथानकाप्रमाणे या दाेघांनी स्वत:च्या आयुष्याचा असा शेवट केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
विहिरीच्या काठावरील चप्पल आढळल्याने सुगावा...१६ वर्षीय मुलीचा विहिरीच्या पाण्यावर मृतदेह तरंगतानाची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता समाेर आली. दरम्यान, विहिरीच्या काठावर मुलाची चप्पल आढळून आल्याने पाेलिसांचा संशय बळावला. विहिरीत दाेघांनी एकाच वेळी उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज बांधत शाेधमाेहीम सुरू केली आणि शनिवारी सायंकाळी ५ वाजता १७ वर्षीय मुलाचाही मृतदेह हाती लागला.