लातूर : ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे़
जून महिन्यात ई- पॉस मशीनद्वारे ट्रान्जेक्शन व आधार लिंकिंग कमी झाली आहे़ त्यामुळे तालुक्यातील एकूण ५७ पैकी १४ रेशन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ त्यात सोरगा, शेलदरा, डोमगाव, डोंगरगाव, सुल्लाळी तांडा, सुल्लाळी, अग्रवाल तांडा, शिवाजीनगर तांडा, अतनूर तांडा, तिरुका, रावणकोळा, येवरी, करंजी, जळकोटातील एका दुकानदाराचा समावेश आहे़ या रेशन दुकानदारांनी पुराव्यासह आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी उपस्थित रहावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी स्पष्ट केले आहे़