सर्वोत्तम परिवाराकडून पूरग्रस्तांना मदत
लातूर : कोकण परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वोत्तम ग्रुप निलंगा यांच्या सदस्यांच्या वतीने १० हजार १५१ रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उत्तम शेळके धर्मवीर भारती, दत्तात्रय दापके यांची उपस्थिती होती. यासाठी योगेश सांडूर, उदय पाटील, तुकाराम पाटील, संतोष स्वामी, परमेश्वर शिंदे, डॉ. प्रदीप इंदलकर, डॉ. हंसराज भोसले, डॉ. प्रल्हाद साळुंके, अरुण साळुंके, केशव गंभीरे, एम.एम.जाधव, संजय कदम, गलगावे सुरेश, कालीदास बिरादार, सय्यद खय्युम, प्रशांत इंगळे, प्रदीप ढेंकरे, बबिता साळुंके, संजय आंबुलगेकर, राहुल मोरे, रविंद्र सोनटक्के, बालाजी गारमपले, दत्तात्रय दापके, जी.टी. होसूरकर, सुनील सोरडे, सोमनाथ चिंचोले आदींनी सहकार्य केले.
लातूर जिल्हा द्योग समूहाच्या वतीने लसीकरण
लातूर : जिल्हा उद्योग समूह आणि महापालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अध्यक्ष चंदुलाल बलदवा, सुनील लोहिया, जुगलकिशोर तापडिया, प्रकाश शर्मा, योगेश तोतला, मधुसूदन सोनी, कमलाकर जाधव, विलास बच्चेवार, गिरीधर तिवारी, कमलेश पाटणकर, चंदू कचोळे, अनिल कलंत्री, हेमंत नावंदर, रितेश लोया, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकरी महेशकुमार मेघमाळे, अशोक क्षीरसागर, दायमी सय्यद, मनपाचे डॉ. महेश पाटील, शारदा पौळ, रोहीणी पगडे, हेमलता देशमुख, कल्पना क्षीरसागर, शाहरुख शेख, डॉ. जयेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
दयानंद कला महाविद्यालयात लसीकरण
लातूर : दयानंद कला महाविद्यालयामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, जयमाला गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, क्रांती माळी, ए.ए. सुरवसे, एन.आर. दहिरे, सी.एम. आदमाने, रोहिणी सांडूर, उमेश यलमटे आदींनी लसीकरण करून घेतले आहे. या उपक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, रमेश बियाणी, सुरेश जैन, संजय बोरा यांनी कौतुक केले आहे.
रस्त्याची दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचत असून, वाहनांचे किरकोळ अपघात होत आहे. अंतर्गत रस्त्याची डागडुजी करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.