शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
5
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
6
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
7
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
8
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
9
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
10
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
11
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
12
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
13
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
14
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
15
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
16
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
17
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
18
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
19
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
20
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....

ऑटोत प्रवासी म्हणून बसवायचे; जबर मारहाण करून ते लुटायचे!

By राजकुमार जोंधळे | Published: June 15, 2023 10:06 AM

तिघांना अटक: दोन ऑटो, ११ मोबाइल जप्त.

राजकुमार जोंधळे, लातूर: ऑटोमध्ये प्रवासी बसवून त्यांना मारहाण करत लुटणाऱ्या तिघा सराईत लुटारूंना लातूर पोलिसांनी बुधवारी दोन ऑटोसह अटक केली. त्यांच्याकडून ११ मोबाईलसह ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात गुन्ह्याचा उलगडा केला. 

पोलिसांनी सांगितले, ऑटोमध्ये प्रवासी म्हणून बसवून घेणे आणि त्यांना धावत्या ऑटोमध्ये मारहाण करणे,  त्यांच्याकडील पैसे, मोबाईल जबरदस्तीने काढून घेत ढकलून देणे, अशा पद्धतीने लुटालूट करणाऱ्या सराईत टोळीतील तोया उर्फ तोहीद उर्फ सोहेल अकबर पठाण, (वय २०, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर), महेश उर्फ बाळू योगीराज विभुते (वय २१, रा. कव्हा, ह. मु. गुमास्ता कॉलनी, कव्हारोड, लातूर) आणि मोहित विजय भडके (वय २३, रा. बारानंबर पाटी, श्याम नगर, लातूर) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना विश्वासात घेत चौकशी केली असता, त्यांनी ऑटोत प्रवाशांना बसवून, एकांतात ऑटो थांबवून मारहाण करून लुटल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून लुटलेले ११ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले दोन ऑटो आणि रोख सात हजार असा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक झाडाझडती घेत पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी सात गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हजबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के ,जमीर शेख ,राजेश कंचे ,संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घातले तपासामध्ये लक्ष...

लातूर शहरात काही दिवसापासून रात्रीच्यावेळी ऑटोत प्रवासी म्हणून बसून घेऊन, ऑटो चालक प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल काढून घेत लुटत असल्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान, याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी माहिती घेत हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.  

काही दिवसांपासून पोलिस पथक होते लुटारूंच्या मागावर...

स्थागुशाचे पोनि. गजानन भातलवंडे यांच्या पथकाने गुन्हेगाराचा शोध सुरु केला. बुधवारी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाळत ठेवली. दोन ऑटोचालक त्यांच्याकडील विविध कंपनीचे मोबाईल कमी पैशात विकत आहेत. ते रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाक्याकडे जाणाऱ्या रिंगरोडवर थांबले आहेत. अशी टीप मिळाल्याने तातडीने पोलिस पथकाने रस्त्यालागत ऑटोसह थांबलेल्या तिघांच्याही मुसक्या असवळल्या.  

पाच पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहेत सात गुन्हे...

लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. यात शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण ठाण्यात सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी