शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By हरी मोकाशे | Published: January 31, 2024 7:16 PM

बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरूवात झाल्याने दरात घसरण होण्यास सुरूवात झाली.

लातूर : विदेशात अपेक्षेच्या तुलनेत अधिक उत्पादन झाल्याने आणि परदेशातून येणाऱ्या क्रूड तेलाचे दर कमी असल्याने देशातील सोयाबीनच्या दरात घसरगुंडी सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. बुधवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ हजार ९८६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर ४ हजार ५३० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक साडेचार लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे यंदा भावात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. दरम्यान, दसरा-दीपावलीच्या कालावधीत ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहोचला होता. त्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरूवात झाल्याने दरात घसरण होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

आवक १० हजार क्विंटलच्या आत...दिनांक - आवक - कमाल - किमान - साधारण१९ जाने. - १३८३३ - ४७८० - ४५०९ - ४७००२० जाने. - ९५०३ - ४७२९ - ४६०१ - ४६५०२४ जाने. - १६९७५ - ४६९९ - ४५५० - ४६२०२५ जाने. - १०६७६ - ४७०१ - ४४९१ - ४६५०२९ जाने. - ९००१ - ४६५० - ४४०० - ४५६०३० जाने. - ९१७९ - ४५२० - ४१०० - ४४५०३१ जाने. - ९९८६ - ४६११ - ४४०५ - ४५३०

अर्जेंटिनामधील अधिक उत्पादनाचा परिणाम...आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सोयाबीनचे दर अवलंबून असतात. गेल्यावर्षीपेक्षा यंदा एकूण सोयाबीनच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उत्पादन घटल्याचे दिसत असले तरी अर्जेंटिनामध्ये अधिक उत्पादन आहे. याशिवाय, डीओसीला मागणी कमी झाली आहे. तसेच विदेशातून येणाऱ्या क्रूड तेलाचे दर कमी आहेत. परिणामी, स्थानिक सोयाबीनचे दर आणखीन घसरले आहेत.- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

अडचण भागविण्यासाठी शेतमाल तारणकडे धाव...काही दिवसांपासून सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आर्थिक अडचणीतील सोयाबीन उत्पादकांची तात्पुरती गरज भागविण्यासाठी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत लातूर तालुक्यातील २१० शेतकऱ्यांनी १४ हजार २०५ कट्टे शेतमाल तारण ठेवला. त्यांना बाजार समितीने स्वनिधीतून ३ कोटी २७ लाख ५१ हजार ५६६ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. - जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी