लातूर : अहमदपूर-चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अहमदपूर शहरात एकाच वेळी पोलीस पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. दरम्यान, अहमदपूर शहरात तब्बल २७ लाख ८० लाखांचा गुटखा जप्त केला. यावेळी सहा जणांना अटक केली असून, पाच फरार झाले आहेत. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्ह्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणवर गुटखा, मटक्यासह इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली. त्यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर, चाकूर ठाणे, दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार अशा एकूण २५ पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या विशेष पथकाने वेगवेगळी पथके तपयार करुन अहमदपूर पोलीस ठाण्यात हद्दीत एकाच दिवशी धाडी टाकल्या. यावेळी पथकाने गुटख्यासह सुगंधित पानमसाला असा एकूण २७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात परवेज इस्माईल शेख (वय २६), अयाज इस्माईल शेख, गौसा तांबोळी, इब्राहिम तांबोळी, निसार बिस्ता, बाळू मुंडे, राजू हामणे, जावेद शेख, आसद तांबोळी, सय्यद इब्राहिम आणि इसाक शेख (सर्व रा. अहमदपूर) यांच्याविरोधात स्वतंत्र चार गुन्हे दाखल केले आहेत. यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, पाच फरार झाले आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दूरपडे, पोलीस उपनिरीक्षक रोकडे, उपविभागयी पोलीस अधिकारी कार्यालय अहमदपूर आणि चाकूर येथील कर्मचारी, लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील जवान, अहमदपूर, चाकूर ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली.