कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. अनेक गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करण्यासाठी नातेवाइकांना धडपडावे लागत आहे. अशा परिस्थितीत रक्तदानासाठी शेकडो युवक-युवती समोर येत आहेत. विविध संस्था व संघटनांनीही पुढाकार घेतला आहे.
लोकमत कार्यालयात रक्तदान...
लोकमत कार्यालयात सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांच्या हस्ते शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत ‘लोकमत’चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी केले.
लोकमत व आयएमएचे शिबिर
लोकमत व आयएमएच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री हॉस्पिटल येथे रक्तदान झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सीईओ अभिनव गोयल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश बेळंबे, तर सूत्रसंचालन डॉ. कल्पना किनीकर यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी माऊली ब्लड बँकेचे संचालक डॉ. उमाकांत जाधव, तसेच डॉ. अरफात टाके, डॉ. शार्दुल शिंदे, डॉ. जितेन जैस्वाल, डॉ. सीतम सोनवणे, डॉ. सोमनाथ बुरबुरे, संगमेश्वर बरुरे, अलिम शेख, सानवी कुलकर्णी, शिवानी गायकवाड, श्वेता गायकवाड, प्रियंका वाघमारे, कविता हुडे, प्रल्हाद माने, वीरेंद्र वाघमारे, विकास चिलमे यांनी परिश्रम घेतले.