औराद शहाजनी : ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत रविवारी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील सद्गुरु विरुपाक्षेश्वर मठात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला व्यापारी, युवकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ५१ जणांनी रक्तदान केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यसेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पाेलीस उपअधीक्षक डाॅ. दिनेश काेल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत, सरपंच आरती बालाजी भंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कदम, भालचंद्र ब्लड बँकेचे डाॅ. याेगेश गावसाने, ज्येष्ठ व्यापारी कुमार मंडगे, किराणा व्यापारी असाेसिएशनचे अध्यक्ष श्रीराम बियाणी, बाळू बिरनाळे, बालाजी भंडारे, सतीश हानेगावे, साेमनाथअप्पा अंबुलगे, आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत किराणा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व वार्ताहर गाेविंद इंगळे, बालाजी थेटे यांनी केले.
लोकमत, किराणा व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. याला महिला रक्तदात्यांनीही प्रतिसाद दिला. शिबिराचा समाराेप तहसीलदार गणेश जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांच्या उपस्थितीत झाला.
शिबिरासाठी औराद किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम बियाणी, बाळू बिरनाळे, बापुराव पाटील, बाळू साेनी, अझहर लष्करे, कुमारआप्पा मंडगे, हाज्जू अनसर, प्रभाकर पाटील, शरणय्या शंकद, विजय कल्याणी यांच्यासह व्यापारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र ब्लड बँकेचे रक्त संकलन अधिकारी डॉ. योगेश गावसाने, किशोर पवार, फरहान शेख, सतीश वेदपाठक, अरुण कासले, सुरेखा हजारे, अन्सर शेख, नितीन क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन :
औराद शहाजानी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पाेलीस उपअधीक्षक डाॅ. दिनेश काेल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत, सरपंच आरती भंडारे, डॉ. ज्ञानेश्वर कदम, डाॅ. याेगेश गावसाने, कुमार मंडगे, श्रीराम बियाणी, बाळू बिरनाळे, बालाजी भंडारे, सतीश हानेगावे, साेमनाथअप्पा अंबुलगे उपस्थित होते.
रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...
ए प्लस रक्तगटाचे रितेश रविराज थेटे, काशिनाथ नीळकंठ मुळे, हाज्जू मस्तानसाब अन्सर, अनिल बाबुराव येळीकर, विष्णू ईश्वर भालके, विक्रम राजेंद्र कुंभार, गुरुचरण नारायण गिरी, प्रदीप भानुदास गोंड, सागर सुभाष गिरी, आकाश प्रल्हाद खामकर, विशाल ईश्वर भालके, विशाल बाबुराव लकशेट्टे, योगिता कालिदास पाटील, शालिवान लक्ष्मणराव शिंदे, ओ प्लस रक्तगटाचे अमोल हणमंतराव बिरादार, ज्ञानेश्वर श्रीमंतराव पाटील, गणेश काशिनाथ सगर, धनराज उदय हरणे, लक्ष्मण शेषेराव थेटे, लक्ष्मीकांत ओमप्रकाश सोनी, छायाबाई ओमप्रकाश सोनी, बापूराव वसंतराव बोंडगे पाटील, सोमनाथ सुभाषराव विठुबोणे, नरसिंग अशोक पांचाळ, प्रभाकर चंद्रकांत पाटील, दीपक चंद्रकांत चिल्लरगे, राहुल सुखलाल उभाळे, संगमेश प्रकाशराव कुलकर्णी, महालिंग सिद्रामप्पा आगरे, बी प्लस रक्तगटाचे सचिन ओमप्रकाश सोनी, नीलेश मोतीरगीर गिरी, वैभव बस्वराज बेलुरे, एजाज फारुक पटेल, शेख रियाज रुकुमसाब, सुरेंद्र सुग्रीव भंडारे, बालाजी पांडुरंग बिराजदार, दत्ता संभाजी हंगरगे, कालिदास सोपानराव पाटील, ओमकार राजेंद्र भातसंगे, किरण चंद्रकांत येडले, ए बी प्लस रक्तगटाचे येरटे सिद्राम गदगेअप्पा, ज्ञानेश्वर विठ्ठल कदमापुरे, भाग्यश्री कल्याणीअप्पा मंडगे, प्रदीप हृदयनाथ बिरादार, तुकाराम बालाजी ढेंबे, अमोल सुरेश कुंभार, बळीराम गणपत सुतार, ओ निगेटिव्ह रक्तगटाचे युनूस खादरसाब टप्पेवाले.
ए निगेटिव्ह रक्तगटाचे रामलिंग शिवकुमार मंडगे, सचिन राजेंद्र भातसंगे, बी निगेटिव्ह रक्तगटाचे योगिराज गणपतराव ढोरसिंगे यांनी रक्तदान केले.