शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ssc exam : पेपरच्या दिवशीचा झाला पित्याचा मृत्यू; दु:खावर मात करून मुलीने दिला इंग्रजीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 4:31 PM

पहाटे उठल्यानंतर पित्याचा अचानक मृत्यू

ठळक मुद्देअश्रू ढाळत मुलीने दहावी इंग्रजीचा पेपर दिला. पेपर सुटल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

औसा (जि. लातूर) : सोमवारचा दिवस उजाडला अन् रोंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पहाटे नित्यनेमाने उठणाऱ्या पित्याचे काही क्षणातच निधन झाल्याने कुटुंबाला धक्का बसला. घरात आपल्या जन्मदात्याचा मृतदेह असताना सोमवारी शीतल रोंगे या मुलीने एकुर्का येथील परीक्षा केंद्रावर दहावी इंग्रजीचा पेपर दिला. पेपर सुटताच टाहो फोडत ती वडिलांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली़ ही घटना औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथे घडली. 

तुकाराम किसन रोंगे (५० रा. बोरगाव ता. औसा) हे शेळीपालनातून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह भागवायचे. कुटुंबात पाच मुली असून, दोन मुलींचे लग्न झाले आहे. घरात असलेल्या तीन मुलींचे शिक्षण आणि संसाराचा गाडा ते मोलमजुरी करुन हाकत होते. सोमवारी रोजच्याप्रमाणेच ते पहाटे ५.३० वाजता झोपेतून उठले. पत्नीशी संवाद साधला. मुलीचा इंग्रजीचा पेपर असल्याने त्यांनी मुलीशी बातचित केली. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चक्कर आल्याने ते अचनाक जमीनीवर कोसळले अन् त्यातच त्यांचे निधन झाले. इकडे अभ्यास करत बसलेल्या शितल आणि रोंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरात जन्मदात्याचा मृतदेह असताना शितलने दु:ख पचवत सकाळी ११ वाजता एकुर्गा येथील छत्रपती शाहू विद्यालयाचे परीक्षा केंद्र गाठले. पित्याच्या निधनाचे दु:ख पचवत अन्

नातेवाईक, गावकऱ्यांना आले गहिवरुनपरीक्षेनंतर घरी परतलेल्या शितलने पित्याचे अखेरचे दर्शन घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि गावकरी गहिवरुन गेले होते. शितल औसा तालुक्यातील भेटा येथील भारत विद्यालयात शिक्षण घेत आहे. 

टॅग्स :ssc examदहावीlaturलातूरEducationशिक्षणStudentविद्यार्थी