लातूर : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल लागला आहे. यंदा जिल्ह्यातून ३९ हजार ६१५ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. त्यापैकी ३९ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले असून, ३८ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण जिल्ह्याचा निकाल ९७.६३ टक्के लागला आहे.
२१ हजार ६२२ मुले या परीक्षेसाठी सामोरे गेले होते. त्यापैकी २० हजार ९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९७.०६ उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर १७ हजार ४२२ मुली या परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी १७ हजार १३४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९८.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा १.७२ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निकालात मुलींचा टक्का आहे. तो यंदाही कायम आहे. दहावीची असो की बारावीची परीक्षा असो, मुली मुलांपेक्षा पुढे असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. लातूर बोर्डात लातूर जिल्हा दुसऱ्यास्थानी असून, प्रथमस्थानी उस्मानाबाद जिल्हा (९७.८४) आहे. तर नांदेड जिल्हा तिसऱ्यास्थानी (९६.६८) टक्के आहे.
बोर्डाकडून झाले होते समुपदेशनगतवर्षी कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा लेखी परीक्षा झाल्या. त्यात विद्यार्थी चांगले चमकले आहेत. बोर्डाने परीक्षेच्यापूर्वी समुपदेशन अभियान राबविले होते. मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, बोर्डाचा निकाल ९७ टक्के लागला आहे. राज्याच्या तुलनेत लातूर बोर्डाचा निकाल चांगला असल्याच्या प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळात उमटल्या आहेत.
लातूर विभागात फक्त ६१ गैरप्रकारपरीक्षा कालावधीत लातूर विभागात ६१ गैरप्रकार झाले होते. त्यापैकी लातूर ३५, नांदेड ११ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १५ गैरप्रकार आढळून आले. या गैरप्रकारात परीक्षार्थ्यांचा निकाल राखीव असल्याचे बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
७७९२ विद्यार्थ्यांना ग्रेस गुणक्रीडा आणि कलेचे प्रमाणपत्र असलेल्या ७७९२ विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण मिळाले आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील ४००६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात १६६३ परीक्षार्थ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यात २०२३ परीक्षार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनाची सोयमार्च, एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षार्थ्याला उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करता येईल. त्यासाठी ३०० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करावा लागेल.
जिल्हानिहाय निकाललातूर ९७.६३उस्मानाबाद ९७.८४नांदेड ९६.६८लातूर जिल्हा निकाल दृष्टिक्षेपविशेष प्राविण्य २१७७३प्रथम श्रेणी ११४९२द्वितीय श्रेणी ४४९२पास श्रेणी ६२७