माणुसकीच्या भावनेतून एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा; अजित पवार यांचे संपकऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:06 PM2021-12-11T19:06:37+5:302021-12-11T19:08:03+5:30
राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे.
लातूर : दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे, महाराष्ट्र सर्वांचाच असून, माणुसकीच्या भावनेतून संप घ्यावा, असे अवाहन लातूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.शनिवारी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलत हाेते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसाेडे, आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी ओमायक्राॅनसह इतर विषयांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.
राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे. सध्या शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील काहीना रुग्णालयात नियमित उपचारासाठी जावे लागते. अशावेळी सुरु असलेल्या संपामुळे त्यांची नाहक पिळवणूक हाेते. आपल्या सर्वांचाच महाराष्ट्र आहे. माणुसकीच्या भावनेतून एसटी संपकरी कामगार, कर्मचाऱ्यांनी दाेन पावलं मागे येत संप मागे घ्यावा.
लातूर : महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी कामगार, कर्मचारी यांना दोन पावलं मागे येत संप मागे घेण्याचे आवाहन लातूर येथे झालेल्या आढावा बैठकीत केले आहे. pic.twitter.com/EP94U3vSdW
— Lokmat (@lokmat) December 11, 2021
इतर राज्याच्या बराेबरीचा निर्णय...
महाविकास आघाडीतील सर्वांनी, एसटी बाेर्डाने प्रयत्न करुन, महाराष्ट्राच्या आजूबाजुला असलेल्या राज्यांच्या बराेबरीने कर्मचाऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात राज्याच्या धर्तीवर निर्णय घेण्यात आले आहेत. आता संपकरी कर्मचारी, एसटीच्या कामगारा संघटनांनी संप मागे घेत, प्रवासी सेवा दिली पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.