येथील रमेश अंबरखाने व अक्षय कोटलवार यांनी सुरू केलेल्या सौर ऊर्जेच्या ५ मेगावॅट प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, शिवाजी गुरुडे, कल्याण पाटील, सभापती मुन्ना पाटील, चंद्रकांत वैजापुरे, मल्लिकार्जुन मानकरी, ताहेर हुसेन, रामराव बिरादार, रामराव राठोड, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. रामप्रसाद लखोटिया, विश्वनाथ मुडपे, डॉ. प्रकाश येरमे, शिवाजी केंद्रे, दिलीप पाटील नागराळकर, प्रदीप बेद्रे, बसवराज पाटील कौळखेडकर, शिवाजी हुडे, विजय सुरशेटवार, सुरेश जैन, विजय निटुरे, श्रीकांत पाटील, आशिष अंबरखाने, सुरेश अंबरखाने, डी.वाय. बिरादार, अजय दंडवते, देवीदास नादरगे, चंद्रकला बिरादार, सुनंदा सरदार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विपुल जोई, सूत्रसंचालन ॲड. व्ही.एन. औरादे यांनी केले. आभार अक्षय कोटलवार यांनी मानले.
विकासाला दिशा देणारे प्रकल्प...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण होणार आहे. बांबूची लागवड व सौर ऊर्जेचा प्रकल्प हे विकासाला दिशा देणारे प्रकल्प असून, हे दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांनी राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. १५ ऑगस्ट रोजी दारात एक वृक्ष लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.