लातूर : मंदिराचे बांधकाम करणाऱ्या शिल्पकार असलेल्या मित्राच्या घरी दाेघे जण मुक्कामासाठी आले. सकाळी उठून त्यांनी घरातील मित्राच्याच पत्नीच्या पर्समधील मंळसूत्र, झुमके असा ऐवज घेवून पसार झाले. ही घटना पाखरसांगवी येथील स्वराज नगर येथे घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नांदेड जिल्ह्यातील दाेघांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, माेहन भुजंग लांडगे (रा. नांदेड) हे लातूर भागात मंदिराचे बांधकाम करतात. ते सध्याला पाखरसांगवी येथील स्वराजनगरात वास्तव्या आहेत. त्यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील शेजगीर गाेविंद गिरी, आणि अक्रम अजीज शेख हे मुक्कासाठी साेमवारी आले हाेते. दरम्यान, गावाकडील मित्र मुक्कामाला आल्याने लांडगे यांच्या पत्नी शेजारी नातेवाईकाकडे मुक्कामी गेली हाेती.गिरी आणि शेख या मित्रांनी रात्री मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून जाताना स्वयंपाक घरातील मित्राच्या पत्नीच्या पर्समधील मंगळसूत्र, झुमके घेवून निघून गेले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.