शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

चोरीचे सत्र थांबेना; लातूर, चाकूर, सोनवती येथून पाच दुचाकी लंपास!

By संदीप शिंदे | Published: February 02, 2023 6:52 PM

लातूर शहरात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले

लातूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून, लातूर शहरातून तीन, चाकूर आणि सोनवती येथून प्रत्येकी एक अशा एकूण पाच दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.लातूर शहरातील माधवनगर येथून एमएच १३ बी.व्ही. २६६३ क्रमांकाची दुचाकी घरासमोर पार्किंग केली होती. २८ जानेवारी राेजी अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी अनिल पंढरीनाथ जाधव यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह सारुळे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत लातूर शहरातील चंद्रनगर येथे पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एमएच २४ के ६१८२ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी बबन यादव ठोकळे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोह गोसावी करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत लातूरातील जिल्हा क्रीडा संकूल गेट नंबर २ येथे पार्किंग केलेली एमएच २४ एएच ७४६३ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने २९ जानेवारी रोजी लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी अजहर महेबुब शेख यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भताने करीत आहेत.

चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथून घरासमोर पार्किंग केलेली एमएच २४ एएम ०७३१ क्रमांकाची दुचाकी १८ ते १९ जानेवारीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी चंद्रकांत भानुदास गुरमे यांच्या तक्रारीवरुन चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीची किंमत ३० हजार असल्याचे फिर्यादीत म्हंटले असून, तपास पोना मामडगे करीत आहेत.

चोरट्यांना शोधण्याचे पाेलिसांसमोर आव्हान...लातूर तालुक्यातील सोनवती येथून एमएच २४ बीपी ७६७० क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने ५ डिसेंबर रोजी लंपास केली. याप्रकरणी किशोर राजेंद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरुन लातूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. क्रीडा संकूल, गंजगोलाईसह गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी