शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण!

By हरी मोकाशे | Updated: May 29, 2024 17:06 IST

जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक पातळीवर अडचणी सुटेनात

लातूर : जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात नळयोजना बळकटीकरणाची ८०७ कामे मंजूर करण्यात आली. अडीच वर्षांचा कालावधी उलटला असतानाही केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नळयोजना कधी पूर्ण होणार अन् पिण्यासाठी शुध्द व पुरेसे पाणी कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

प्रत्येक घरास दररोज ५५ लिटर शुध्द पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गतची सर्व गावे आणि वाडी- ताड्यांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेअंतर्गत नळयोजना बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच वर्षांपूर्वी ८०७ कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास ६५० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, आतापर्यंत केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत.

औसा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - काम पूर्णअहमदपूर - २९औसा - ४३चाकूर - २०देवणी - ०४जळकोट - ०५लातूर - १५निलंगा - ३४रेणापूर - १७शिरुर अनं. - ०९उदगीर - २३एकूण - १९९

आठ योजनांना प्रारंभच नाही...जलजीवन मिशनअंतर्गतच्या आठ नळ योजना बळकटीकरणाच्या कामांना अद्यापही प्रारंभच झाला नाही. त्यात औसा तालुक्यातील १, देवणी- ४, शिरुर अनंतपाळ- २ आणि उदगीर तालुक्यातील एका योजनेचा समावेश आहे. या योजना सुरु व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने सूचना करण्यात येत आहेत.

स्थानिक राजकारणाने योजनेमध्ये व्यत्यय...जलजीवन मिशनअंतर्गतच्या विहिरीसाठी तसेच जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जागा उपलब्ध झाली नाही. परिणामी, ८ योजनांची कामे सुरु झाली नाही. त्यामुळे अद्यापही कामाचा श्रीगणेशा झाला नाही.

० टक्के काम - ०८२५ टक्के - ११७५० टक्के - १८०७५ टक्के - १९८९९ टक्के - १०५१०० टक्के - १९९

तहसीलदार, बीडीओंनी जागेचा तिढा सोडवावा...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विहीर, जलकुंभासाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. तसेच ज्या ठिकाणचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत, त्या ठिकाणचे सर्वेक्षण करुन नवीन जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. वेळेत काम न करणाऱ्या गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. तसेच काही गुत्तेदारांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे.- उदय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीLatur z pलातूर जिल्हा परिषद