लातूर : यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँड सेवा (करार सेवा) सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा करायची नसेल तर १० लाख रुपये भरून सवलत घेता येणार आहे. या सेवेसाठी २१ एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता ही बाँड सेवा करावी लागणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात दोन वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. हा निर्णय आधीपासूनच आहे. मात्र काही विद्यार्थी पैसे भरून त्यातून सवलत घेत असत. यंदा मात्र कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सेवा बंधनकारक राहील, असे स्पष्ट केले.
कोरोना काळात वैद्यकीय सेवा वेळोवेळी मिळत नसल्याचा अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना आला. काही ठिकाणी सुविधा आहेत, मात्र वैद्यकीय अधिकारी नाहीत. तर काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, मात्र कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाने आता हातपाय पसरले आहेत. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरांकडे धाव घेतली जात आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने यंदा एमबीबीएस उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीणमध्ये सेवा देणे बंधनकारक केले आहे.
nकोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर याचा भार पडत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. मात्र ग्रामीण भागात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा उपलब्ध नाही. यातूनच ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे उपचारासाठी येत आहेत.
nही परिस्थिती पाहता वैद्यकीय क्षेत्रातील काही विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन सेवा करण्याची तयारी दर्शवीत आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात सेवा करण्याची हीच खरी वेळ असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी असा सेवेबाबत दुजाभाव करता येणार नाही, असे काही विद्यार्थी म्हणाले.nकोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर याचा भार पडत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. मात्र ग्रामीण भागात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा उपलब्ध नाही. यातूनच ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे उपचारासाठी येत आहेत.