शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

By हरी मोकाशे | Published: June 14, 2023 3:57 PM

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम

लातूर : शासनाच्या हर घर नर्सरी मोहिमेस बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांच्या मनावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व बिंबवण्यास मोठी मदत होणार आहे.

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. दरम्यान, या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे. लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या हर घर नर्सरीला बळकटी मिळणार आहे.

अनोख्या पध्दतीने हाेणार स्वागत...जिल्ह्यातील सर्व गावांत शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दोन बिया व बिया रुजविण्याच्या पिशवीत माती टाकून देण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पिशवीत बिया रुजविण्यापासून ते पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण देखभाल त्या विद्यार्थ्याने करावयाची आहे. बी संगोपनापासून ते रोप तयार होईपर्यंतच्या संगोपनाबाबतची सर्व निरीक्षणे विद्यार्थ्यांनी विशेष नोंदवहीत नोंदवावी लागणार आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी वृक्ष लागवड...मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड १७ सप्टेंबर रोजी योग्य त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर राहणार आहे.

अडीच लाख रोपांची निर्मिती...या उपक्रमातून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांमार्फत अडीच लाख रोपांची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात शाळा व ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. बिया आणि पिशव्यांची जबाबदारी ग्रामपंचायती, नगर पंचायतींवर सोपविण्यात आली आहे.

वनक्षेत्र वाढीस हातभार...पहिलं पाऊलं- एक बीज लावून या विशेष उपक्रमामुळे बालकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी जिव्हाळा निर्माण होईल. त्यामुळे बालकांना वृक्षांचे महत्त्वही समजेल. या मोहिमेतून जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरSchoolशाळाEducationशिक्षण