शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

लातूर मनपाच्या वाचन कट्ट्याचे यश; १ लाख वाचक, १३ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड

By हणमंत गायकवाड | Published: November 18, 2023 5:03 PM

वाचन कट्ट्यासह ग्रंथालयात येऊन या वाचकांनी ज्ञान मिळविण्याची भूक भागविली आहे.

लातूर : महानगरपालिकेच्या ग्रंथालयाच्या वतीने मनपाच्या चारही झोनमध्ये प्रत्येकी दोन वाचन कट्ट्यांची निर्मिती करण्यात आली असून, गेल्या वर्षभरात १ लाख वाचकांनी या योजनेअंतर्गत वृत्तपत्र वाचनाचा लाभ घेतला आहे. 

वाचन कट्ट्यासह ग्रंथालयात येऊन या वाचकांनी ज्ञान मिळविण्याची भूक भागविली आहे. मराठी, हिंदू, उर्दू माध्यमातील जवळपास ४५ वृत्तपत्र वाचकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या ग्रंथालयाने गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले आहेत. वाचन कट्ट्याच्या निर्मितीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिले असून, या अभ्यासिकेतील १३ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झालेली आहे.

९५० ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्धस्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे जवळपास ९५० ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रात्रं-दिवस विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खुले आहे. त्यामुळेच १३ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड झालेली आहे.

अंध वाचकांसाठी ब्रेल लिपीमध्ये ग्रंथशहरातील अंध वाचकांची सोय व्हावी, यासाठी लातूर मनपाच्या ग्रंथालयाने ४० दर्जेदार ग्रंथ ब्रेल लिपीमधून उपलब्ध केले आहेत. त्याचा लाभ वाचक घेतात. केवळ वृत्तपत्रच नाही, तर संदर्भ ग्रंथ आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे ग्रंथ ग्रंथालयाने उपलब्ध केले आहेत.

१६ कॅमेऱ्यांची नजरग्रंथालय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, १६ कॅमेऱ्यांची नजर ग्रंथालयावर आहे. आतून आणि बाहेरून १६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना तसेच वाचकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रंथालयातून सेवा दिली जात आहे.

५० हजार ग्रंथसंपदामहानगरपालिकेच्या शिवछत्रपती वाचनालयामध्ये ५० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. शिवाय, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ९५० ग्रंथ उपलब्ध असून, चालू घडामोडींसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषेत ४५ वर्तमानपत्रेही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

२४ तास ग्रंथालय खुलेस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय २४ तास खुले आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात १३ विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पदांवर निवड झाली आहे. मोफत सेवा देणारे एकमेव ग्रंथालय असून, यात अधिक ग्रंथसंपदेची भर पाडली जाणार असल्याची माहिती आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका