आषाढीनिमित्त घरातच केले पूजन
लातूर : आषाढी एकादशीनिमित्त लातूर शहर व जिल्ह्यात वारकरी संप्रदाय व नागरिकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे घरातच पूजन केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही शहर व जिल्ह्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे घरच्या घरीच विठ्ठलाचे दर्शन घेत पूजन केले. माजी मुख्याध्यापक बाळासाहेब चाकूरकर यांनीही विठ्ठल-रुक्मिणीची आरास मांडून पूजन केले.
हलक्याशा पावसाने सरावास व्यत्यय
लातूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. परिणामी, जिल्हा क्रीडा संकुलातील दैनंदिन सरावास येणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी व्यत्यय येत आहे. मैदानावर चिखल झाल्याने व्हॉलिबॉलसह फुटबॉल, क्रिकेट, सॉफ्टबॉल, बेसबॉल व मैदानी खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हलक्याशा पावसाने खेळाडूंच्या दैनंदिन सरावास अडचण निर्माण झाली आहे.