ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ३१ - लातूर जिल्ह्यातून वाहणा-या तेरणा नदीला अनेक वर्षांनी पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील चार ठिकाणच्या बंधा-यांची दारे उघडण्यात आली आहेत.
तगरखेडा बंधा-याची चार मीटरने सहा दारे, मदनसुरी अर्ध्या मीटरने चार दारे, किल्लारीची अर्ध्या मिटरने चार दारे उघडली असून तेरना-मांजरा दोन्ही संगमात पूर्ण पात्र भरुन वहात आहे. दोन्ही नदयाचे अतिरीक्त पाणी कर्नाटकमध्ये सोडण्यात आल्याची माहीती औराद जलसिंचन शाखा अधिकारी एस. आर. मुळे यांनी 'लोकमत'ला दिली.