शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चकचकीत महामार्गाची चर्चा; घरासमोर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:40 PM

देशात आणि तुलनेने महाराष्ट्रात चकचकीत महामार्गांची चर्चा जोरदार आहे. सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायला एक जमेचा मुद्दा आहे.

लातूर : देशात आणि तुलनेने महाराष्ट्रात चकचकीत महामार्गांची चर्चा जोरदार आहे. सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायला एक जमेचा मुद्दा आहे. मराठवाड्यातही प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची बांधणी सुरू आहे. मावेजा अन् आंदोलनाचा धुराळा काही ठिकाणी उडत असला तरी काही कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसते. परंतु, घरापासून महामार्गापर्यंत पोहोचेपर्यंत सामान्य माणसाची मोठी कसरत होते. लहान गावात राहणारा असो की जिल्ह्याच्या ठिकाणी तो चकचकीत महामार्गांची चर्चा करीत असला तरी घरासमोरचे खड्डे पाहून खिन्न होतो.मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड सर्व जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे. उस्मानाबाद-सोलापूर काम पूर्ण होऊन ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने वाहने धावत आहेत.  त्याचवेळी जहिराबादकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचा धुराळा संपता संपत नाही. कामे अर्धवट आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण होतील आणि राष्ट्रीय महामार्ग सेवेत येतील, याबद्दल तूर्त शंका नाही. परंतु त्या महामार्गांपर्यंत पोहोचणारे राज्य रस्ते आणि जिल्हा रस्ते यांची अवस्था दयनीय आहे. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातूनही गेल्या चार वर्षात रस्त्याची कामे होऊ शकली नाहीत. लातूर-उदगीर रस्त्याची दुरवस्था कायम आहे. हे एक उदाहरण झाले, सबंध राज्यातील बहुतांश राज्य रस्ते याच अवस्थेत आहेत. साधारणत: ९० हजार किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील २५ हजार किलोमीटरचे रस्ते प्रवास करण्याजोगे आहेत तर २५ हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. उर्वरित रस्त्यांमधूनही खड्ड्यांचा अंदाज घेत वाहनधारकांना चालावे लागते. डिसेंबर २०१७ अखेर रस्त्यांवर खड्डे ठेवणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, खड्ड्यांनी रस्त्याचा पिच्छा सोडलेला नाही.जी अवस्था राज्य आणि जिल्हा रस्त्यांची आहे तीच अवस्था नगरपालिका, महापालिका हद्दीतील रस्त्यांचीही आहे. लातूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. एक मुख्य रस्ता वगळता अन्य कुठल्याही रस्त्यावर डांबर आणि सिमेंट ओतलेले दृश्य नाही. कमी-अधिक फरकाने तालुका शहरांच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. जिथे खोदकाम झाले आहे ते जैसे थे आहे. नालीची कामे अर्धवट आहेत. जिथे गरज नाही तिथे नाली केली आहे. शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये शोधावी लागतात. त्यामुळे एकीकडे महामार्गाच्या चकचकीत रस्त्यांचे चित्र आणि दुसरीकडे घरासमोर खड्डेच खड्डे अशी विसंगती दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गाची बांधणी हा केंद्र सरकार अखत्यारीत विषय आहे. तिथे निधी मुबलक आहे. कोट्यवधींचे महामार्ग जाहीर होत आहेत. परंतु, भाजपाच्याच ताब्यात असलेल्या नगर पालिका आणि महापालिका निधीअभावी रस्त्यांवरील खड्डेही बुजवू शकत नाहीत. अपवाद एक-दोन रस्त्यांचे काम होत असले तरी लातूरसारख्या महापालिका क्षेत्रात अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत आहेत.

टॅग्स :laturलातूर