...
श्री गणेश विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : वासनगाव येथील श्री गणेश विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. यात स्नेहा बालाजी भांगे, माऊली राजेंद्र गरगटे, श्रध्दा बाळासाहेब ताटे यांचा समावेश आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक लखनगिरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
...
सैन्यात भरती झाल्याने तरुणांचा सत्कार
निलंगा : तालुक्यातील गुंजरगा येथील महेश भरत शिंदे व विष्णू भीम शिंदे यांची सैन्य दलात निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महेश धुमाळ, ज्ञानदेव धुमाळ, सरपंच लक्ष्मण सोनकांबळे, उपसरपंच सुधाकर धुमाळ, पोलीस पाटील मोहन पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष माधव शिंदे, भीम धुमाळ, दिलीप धुमाळ, आण्णाराव गोबाडे, ओम शिंदे आदी उपस्थित होते.
...
माकणी येथे शालेय साहित्याचे वाटप
निलंगा : तालुक्यातील माकणी थोर येथील जिल्हा परिषद शाळेत ५० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच बजरंग येळीकर यांच्या वतीने ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीनिवास श्रीमंगले होते. यावेळी एम.व्ही. कुलकर्णी, शिवाजी जाधव, मुख्याध्यापक सुनील शिंदे, तुकाराम सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य बालाजी सूर्यवंशी, व्यंकट गायकवाड, ओम चंदर सूर्यवंशी, विजयकुमार सूर्यवंशी, आत्माराम सूर्यवंशी, मुख्याध्यापक राजकुमार स्वामी, पी.जे. होळीकर, म्हेत्रे, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.
...
उजनी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार समारंभ
औसा : तालुक्यातील उजनी येथून तुळजापूर आगाराची पुणे बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी एसटीसोबत तुळजापूर आगाराचे व्यवस्थापक राजकुमार दिवटे, वाहतूक निरीक्षक महादेव बारकुले, सागर सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक सोमनाथ आदटराव, वाहक मनोज पाटील, चालक रामदास सांगळे हे आल्याने त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच युवराज गायकवाड, माजी सभापती योगिराज पाटील, मजहर पठाण, शेखर चव्हाण, प्रवीण कोपरकर, संजय रंदवे, शाम सूर्यवंशी, धनराज बरदापुरे, युवराज जोशी, बसवराज बरदपुरे आदी उपस्थित होते.